माहिती
वाके हे मालेगाव तालुक्यातील शेतीप्रधान गाव असून गावाची एकूण लोकसंख्या २,४६७ आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन व लघुउद्योग असून उपजीविकेचा प्रमुख आधार जमीन व कृषीपूरक उद्योग आहे. गावात पाण्याचा पुरवठा विहीर व नळयोजना मार्फत केला जातो. गावात प्रमुख सण म्हणून अक्षय तृतीया (ग्रामयात्रा), गणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी उत्साहात साजरे केले जातात. गावातील मंदिरे व तलाव पर्यटन आणि सांस्कृतिक आकर्षणाचे केंद्र आहेत.
ग्रामपंचायत स्वच्छता, पाणी, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण संवर्धन या घटकांवर विशेष भर देते.